HomeViralफोटोमधून शोधून काढा १२ चुका, बघा जमतंय का...९९% लोक झालेत फेल...

फोटोमधून शोधून काढा १२ चुका, बघा जमतंय का…९९% लोक झालेत फेल…

सोशल मिडियावर दररोज कोणतीना कोणती गोष्ट व्हायरल होत असते. काही गोष्टी अशा असतात ज्या नकळतच तुमच्यामध्ये दडलेली कौशल्य जगासमोर आणत असतात. ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो त्याचा एक भाग आहेत. असाच एक फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो १९५० मधील असल्याचे सांगितले जात आहे. तुम्हाला दिसत असलेला फोटो हा काही साधासुधा फोटो नाही. यामध्ये एक कोडे लपले आहे जे तुम्हाला सोडवायचे आहे. हा फोटो तुमच्या कौशल्यांमध्ये आणखीनच भर टाकणारा आहे. जर तुमचा वेळ जात नसेल आणि तुम्हाला कंटाळा आला आहे तरीही हरकत नाही. हा फोटो पहा म्हणजे तुमचे माइंड फ्रेश होईल. फोटोमध्ये एक छान कुटुंब पाहायला मिळत आहे.कुटुंबातील काही

सदस्य खाण्याचा आनंद लुटत आहेत तर काही स्वत:मध्येच रमले आहेत. पण या फोटोमध्ये अनेक चुका दडल्या आहेत. ज्या तुम्हाला शोधून काढायच्या आहेत. फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला त्या चुका लक्षात आल्या का ?

फोटोमध्ये १२ चुका दडल्या आहेत ज्या तुम्हाला १३ सेकंदामध्ये शोधून काढायच्या आहेत. जरा तुमच्या डोक्याला चालना द्या आणि फोटो लक्षपूर्वक पहा. १३ सेकंदामध्ये १२ चुका शोधून काढायच्या आहेत. तुम्हाला त्या चुका सापडल्या का ? नाही… तर आम्ही तुमची मदत करतो.

फोटोमध्ये पॉटला हँडल नाही, टेबलावर ब्रेड लोफचा आकार क्लाऊड म्हणजे ढगांप्रमाणे आहे आणि मुलानं कापलेला ब्रेडचा तुकडा आयताकृती आहे, फोटोमधील मुलगी चहा चमचा ऐवजी नाईफने ढवळतेय, मेणबत्ती असणारा लँप सॉकेटला लावला आहे, माणूस पेपर उलटा वाचत आहे, आरसा एकाच दोरीला टांगला आहे, इलेक्ट्रीक हीटरमधून धूर येताना दिसत आहे, पिंजऱ्यात मांजरीला बंद केले आहे, भिंतीवर दिसत असलेल्या फोटो उलटा आहे, कॉफी टेबलला एक पाय नाही.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here


Categories

Popular Posts